लहानपणी वाचलेली गोष्ट आठवते, एका माणसाला कुणीतरी सिद्ध पुरूष भेटतो. तो सिद्घपुरूषाला विचारतो मी कधी मरणार आहे. सिद्ध पुरूष म्हणतो की जो जन्माला आलाय तो कधी तरी मरणारच . त्या माणसाचे समाधान या उत्तराने होत नाही. तो म्हणतो की नाही मला हे कळलेच पाहिजे की मी कधी मरणार ते. त्याच्या दूराग्रहामूळे साधूचा नाईलाज होतो, आणि वेळ मारून नेण्यासाठी तो त्याला एक ताबीज देतो. आणि सांगतो हा ताबीज जो पर्यंत आहे तो पर्यंत तू जिवंत, तूटला की तुझ्या आयुष्याची दोरही तुटली म्हणून समज. त्या दिवसापासून तो ताबीज खूप जपतो. आणि त्या ताबीजात त्याचा जीव आहे ही कल्पना त्याच्या मनाची जबरदस्त पकड घेते आणि तो त्याच भ्रमात जगत राहतो. कालांतराने ताबीजाचा दोरा जूना होतो आणि तुटतो. तो माणूस समजतो की ताबीज तुटलाय म्हणजे तो जीवंत नाही. लोक त्याला सांगतात की तू मेलेला नाहीस जीवंत आहेस, पण तो लोकांवर त्याचा विश्वास बसत नाही. जगण्या मरण्याचे एक विज्ञान असते पण त्याला तो प्रतिकात्मक ताबीज विज्ञानापेक्षा मोठा वाटत असतो. तो तुटलाय म्हणजे मी जीवंत असणे शक्य नाही असे समजून स्वतःच कबर खोदतो आणि स्वतःच त्यात झोकून देतो. गोष्टीचे तात्पर्य काय एखाद्या माणसाच्या मनावर एखादी गोष्ट कोरली की त्याची एक वेगळीच मानसिक अवस्था तयार होते आणि त्यावर काही ईलाज नसतो.
अशीच काहीशी अवस्था आपल्या देशातल्या लेखक आणि विचारवंतांच्या एका मोठ्या गटाची झाली आहे असे त्यांच्या अलिकडच्या वागण्यावरून वाटते. त्यांच्यादृष्टीने कॉंग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांचा एकमेव पाठीराखा होता कॉंग्रेस सत्तेवर नसणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा विचार (धर्म) बूडाला अशी त्यांची समजूत झाली आहे. कारण त्या माणसाला जसे ताबीजाचे महत्त्व होते तसेच यांना तोंडदेखले धर्मनिरपेक्ष असलेल्या पक्षांचे. मग कॉंग्रेसप्रणीत सरकारांच्या सगळ्याच कृती त्यांच्यासाठी आपोआप धर्मनिरपेक्ष होऊन जातात. त्यामुळे हा ताबीज तुटला म्हणजे त्यांनी आयुष्यभर जपलेली मूल्ये कायमची संपली असे त्यांना वाटू लागलेय. याच भयाने त्यांना खूप आधीपासून ग्रासले आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर येईल तो देशासाठी काळा दिवस असेल अशी विधाने करून त्यांच्यापैकी काहींनी आधीपासूनच आपल्या पराभूत आणि भयभित मानसिकतेचे दर्शन घडवायला सुरुवात केली होती. त्यांच्या अशा वागण्यांने मोदीं आणि त्यांच्या पक्षाचा मार्ग सोपा करून ठेवला होता. असे करून त्यांनी स्वतःच्या विचारांची कबर स्वतःच खणायला घेतली होती. त्यांना मोदी आणि त्यांचा पक्ष सत्तेपर्यंत जावू शकतो याची जाणीव सगळ्यांच्या आधी झाली होती. त्यामुळे गेल्या तेरा वर्षापासून सातत्याना आक्रस्ताळी मोदी विरोध सुरू होता. त्यामुळेच कोणाच्या ध्यानीमनी नसताना आपसुकच मोदी देशाच्या राजकारणात मध्यवर्ती स्थानी आले.
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशात अमुक अमुक गोष्टी होणार असे त्यांच्या मनात पक्के ठसले होते. तशी नजर आधीच तयार असल्यामुळे त्यांनी त्या चिकित्सक नजरेतून घडामोडींकडे नव्याने पहायला सुरूवात केली. आधीच्या सरकारच्या काळात त्यांना तसे पाहण्याची आवश्यकता वाटत नव्हती. कारण त्यांच्या हातात धर्मनिरपेक्षता सुरक्षित होती कारण धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत होते म्हणजे ताबीज सुरक्षित होता. माणसाच्या मनाची ताकद जबरदस्त असते, मनात उभारी असेल आत्मविश्वास असतो आणि परिस्थितीशी सामना करण्याची धमक असते. पण उलट स्थिती असेल तर माणूस भयग्रस्त होतो. आणि भयभित होण्यासाठी कारणे शोधतो. त्यामुळेच गेल्या दिड वर्षापासून या देशात अनेकांचा श्वास गुदमरायला लागला. कारण ताबीज तुटला की सगळं संपलं हे ठरलेलं होतं. हे गुदमरलेपण जगजाहीर करण्यासाठी त्यांना अनेक घटना घडत गेल्या. कारण सर्व धर्मांच्या आणि विचारांच्या अतिरेकी वृत्तीना आपल्या देशात फ्री हॅंन्ड देण्यात आला आहे. इतका की त्यांनी लोकशाही व्यवस्था हायजॅकच केली आहे. त्यामुळे त्यांच्यात सतत टकराव सुरू आहे. त्यातून सातत्याने हिंसक घटना घडत आहेत. पण प्रत्येकाला दूसऱ्याबाजूने झालेली हिंसा जितकी गंभीर वाटते तितकी आपल्या बाजूची वाटत नाही. त्यामुळेआपल्यावरच सगळ्यात जास्त अन्याय होतोय हे दाखवण्याची स्पर्धा लागली आहे. आणि तो अन्याय मोठा आणि अतिरंजीत करून सांगण्याची चढाओढ लागली आहे. त्यातून अनेक ठिकाणी अन्यायाचा प्रतिकार म्हणून हिंसक घटनांचे निर्लज्ज समर्थन होत असताना आपण पाहतो.
विरोधी विचारांचे सरकार सत्तेत असल्यावर असे प्रकार वाढावेत जेणेकरून त्याचे राजकारण करता येईल अशी गिधाडी वृत्ती आपल्या देशात खूप वाढली आहे. अशा गिधाडांच्या सुदैवाने आणि देशाच्या दूर्दैवाने असे मुद्दे सरकार पक्षाकडून आयतेच उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे पराभूत झालेल्या राजकीय पक्षांनी सरकारविरोधी माहोल तयार करायला सुरूवात केली. पण ते लोकांसमोर आधीच उघडे पडल्याने त्यांच्या विश्वासार्हतेचा मोठाच प्रश्न होता. हवा तसा माहोल तयार होत नाही असे लक्षात आल्यानंतर सरकारविरोधातला हा आवाज अॅम्फ्लिफाय करण्यासाठी लेखक विचारवंतांना आखाड्यात ओढले गेले. . खरे तर अशाप्रकारे माहोल तयार करण्याचे एक तंत्र आपल्या देशात विकसीत होत आहे. त्यामध्ये मानवी स्वभावाचा खुबीने वापर करण्यात येतो. सामान्य माणूस खोलात जावून विचार करत नाही, समाजातल्या मान्यवर लोकांच्या विचारानी तो प्रभावित होत असतो. त्यामुळे विचारवंतानी लोकप्रिय धारणेपेक्षा वेगळा सूर लावला की लोकांना आपलेच चुकलेच असे वाटण्याची शक्यता असते त्या गृहितकावर सध्याचे विचारवंतांचे बंड उभे राहिले आहे. पण आताच्या भारतीय समाजावर कुठल्याही विचारांचा कितपत प्रभाव आहे हा संशोधनाचा विषय आहे.
खरे तर जगाच्या आणि देशाच्या इतिहासात अनेक लेखक आणि विचारवंत क्रांतीचे अग्रदूत ठरले होते. त्यांनी कुठला तरी विचार मांडावा आणि जनतेने तो उचलून धरावा आणि त्यांच्या मागे जावे अशी असंख्य उदाहरणे आहेत. पण आताची परिस्थिती वेगळी आहे, कोणताही विचाराची तितकी मोहिनी लोकांवर पडत नाही. वाचता येणाऱ्यांचे प्रमाण हजारो पटीने वाढले असतानाही ही परिस्थिती आहे हे विशेष. याचा अर्थ एक तर असा होतो की आजकालच्या विचारांमध्ये जनतेला आकर्षित करण्याची ताकद नाही ताकद नाही किंवा जनताच कुचकामी आणि नालायक झाली आहे. तसे नसते तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विचारवंत आणि लोकशाही मूल्यांचे रखवालदार खडे असताना. त्यांच्यामागे सर्वप्रकारची सरकारी आर्थिक, ऱाजकीय, वैचारिक ताकद उभी असताना जनतेने त्यांना हुलकावणी देत हुकुमशाही, जीर्णमतवादी, पुनुरूज्जीवनवादी, फॅसिस्ट लोकांचा पर्याय का निवडावा हा प्रश्नच आहे. या प्रश्नाची प्रामाणिक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर त्याचा उलगडा होऊ शकतो पण त्यांना ती शोधण्यात काही स्वारस्य दिसत नाही. या बदलाचे एक कारण हे असू शकते की की लोकशाही मूल्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हे रखवालदार कुठल्यातरी दुसऱ्याच कामात गुंतलेले होते किंवा त्यांना डुलकी लागली होती. त्यावेळी त्यांच्या फॅसिस्ट उंट त्यांच्या तंबूत घुसला. त्यांना आलेली ही ग्लानी मान्य करून त्यांनी खडबडून जागे झाले पाहिजे होते. आपल्या उध्वस्त तंबू परत उभा करण्यासाठी अगदी सुरूवातीपासून जुळवाजुळव करायला पाहिजे होती. पण तसा कोणताही प्रयत्न करण्याऐवजी उंटाच्या नावाने शिव्याशाप देण्याचा मार्ग त्यांनी निवडला आहे. त्या बरोबरीने उंटाच्या प्रेमात पडलेल्यांना नालायक ठरवण्याची यांना घाई झाली आहे.
विचारवंतांच्या मूल्यनिष्ठा प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही, पण त्यांच्या या मूल्यनिष्ठांचा राजकारणाचा एक मोहरा म्हणून वापर होतोय. अशा वापरामूळे तात्पूरता माहोल तयार होईलही, पण त्यांना अभिप्रेत असलेली मूल्ये रूजवण्यासाठी त्याचा उपयोग होणार ऩाही. उलट विचारवंतांनी आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा (पुण्य)पणाला लागले आहे. कारण कधी नव्हे एवढा विरोधाचा आणि टीकेचा सूर या बंडांच्याबाबतीत समाजातून उमटला आहे. विरोध सूरात बोलणाऱ्याना मोदी भक्त म्हणून हेटाळणी केल्याने मोदी भक्तांना काही फरक पडणार नाही. उलट मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी हे घडवून आणलेले बंड आहे या सरकाच्या आरोपांना पुष्टीच मिळेल. याचा सरकारवर आणि लोकांवर अपेक्षित परिणाम झाला नाही तर सगळ्यात जास्त धक्का विचारवंतांच्या समाजातील प्रतिमेला बसणार आहे. कारण हे शस्त्र कायमचे निकामी होऊन जाणार आहे.
मूळात हिंदूत्ववादी सरकार सत्तेवर येणे हाच धर्मनिरपेक्षतेचा पराभव आहे असे मानणे चुकीचे आहे आपल्या विचारांना या देशात स्थान नाही असे मानून सैरभर होणे म्हणजे पराभूत आणि भयग्रस्त मानसिकतचे लक्षण आहे. हा पराभव विचारांचा नसून लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत विचारांना आपल्याला पाहिजे तसे वाकवून केलेल्या सत्तालोलूप राजकारणाचा, आणि लोकांना गृहित धरून त्यांच्याच आशाआकांक्षाचा बळी देणार्या वृत्तीचा आहे. मूळ समस्या दूर झाल्याशिवाय ग्लानीत गेलेल्या विचारांची पुनर्स्थापना होण्यासाठी हे बंड उपयुक्त ठरणार नाही. तस्लिमा नसरीनची भारतीय धर्मनिरपेक्षतेवरील टीप्पण्णी काय चुकलेय हे समजून घेण्यासाठी ऊपयुक्त ठरेल.

1 comment:
भारी...काँग्रेस संपला की पुरोगाम्यांचा धर्म बुडाला, ही त्यांची पक्की समजूत आहे!
Post a Comment