पाकीस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी
यांच्या पुस्तकाच्या मुंबईतील प्रकाशन सोहळ्याला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यक्रमाचे
आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकल्याने
आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. शिवसेनेच्या प्रतिक्रियावादी राजकारणाचा
देशातले बुद्धिवादी आपल्या नेहमीच्या शैलीत समाचार घेत आहेत. शिवसेनाच नाही तर देशातल्या
इतर अनेक संघटनामध्ये अशा राडेबाज कार्यकर्त्यांचा भरणा आहे. त्यांची मानसिकता नेमकी काय असते आणि हा कार्पयकर्ता कसा तयार कसा याचा थोडाही विचार आपल्याकडे होताना दिसत नाही. त्यामुळे देशातले वैचारिक विश्व आणि प्रत्यक्ष कृतीशील कार्यकर्ता
यांचात शेकडो कोस अंतर पडले आहे. त्यामुळे विचारवंत बोलत असलेली भाषा कृतीशील कार्यकर्त्यांना परग्रहावरची वाटू लागली आहे.
खरेतर लोकशाहीप्रेमीं बुद्धीवाद्यांनी अशा राडेबाज
संघटनांना कार्यकर्त्यांची रसद मिळू नये यासाठी व्यापक प्रबोधन मोहीम हाती घ्यायला
पाहिजे होती. त्यांची सतत हेटाळणी करून त्यांच्यात झुंडीची मानसिकता वाढवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी त्यांना विश्वासात घेऊन त्याचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास वाढावा
असे कार्यक्रम आखायला हवे होते. पण प्रत्यक्षात यापैकी काहीही करण्यात या विचारवंतांना
कोणताही रस असल्याचे दिसत नाही. उलट या राडेबाजांनी असेच राडे घालावेत याची वाट बघत
हे लोक जणू दबा धरुन बसले असल्या सारखे वाटतात. या राडेबाज संघटनानी नेमाने काही
करावे आणि विचारवंतांनी त्याच्यावर तुटून पडावे हे आता देशाच्या अंगवळणी पडले आहे.
जर या राडेबाजांनी खूप दिवस काहीच केले नाही तर या विचारवंतांना कदाचित चुकल्या चुकल्यासारखे
वाटत असावे. त्यामुळेच ते अधून मधून त्यांना
चिथावतही असतात.
समाजाचे वैचारीक नेतृत्त्व करणाचा दावा करणाऱ्यांनी खरे तर सामाजिक सलोखा वाढीस लागावा, कार्यकर्ता प्रगल्भ व्हावा अशी मांडणी करणे अपेक्षित असते. समाजात काही चुकीच्या धारणा रुजल्या असतील तर त्याबद्दल संयत मांडणी करून प्रबोधन करणे हे लोकशाही मजबूत करणारे ठरले असते. पण तसे होण्याऐवजी बऱ्यापैकी जनाधार मिळवलेल्या प्रस्थापित पक्षसंघटनांना चिथावणी देणे, त्यांच्या श्रद्धास्थानांची हेटाळणी करून त्यांना कायदा हातात घ्यायला भाग पाडणे, त्यातून त्यांची व्यापक बदनामी होईल आणि त्यांना पाठींबा देणाऱ्या जनतेच्या मनात त्यांच्याविषयी घृणा निर्माण होईल अशी एकंदरीत व्युहरचना दिसते. पण त्याला कुठलेही यश आलेले नाही. उलट या चिथावणीतून या संघटना अशा विचारवंतांना विशिष्ट धर्माच्या, देशाच्या, अतिरेकी संघटनांचे एजंट म्हणून घोषित करतात आणि त्यांच्या विषयी हेट कॅंम्पेन राबवतात. आणि त्यातून असे राडेबाज कार्यकर्ते निर्माण होतात. एकदा त्यांच्या हेतू विषयी शंका निर्माण झाली की विचारवंतांचा विचार फक्त त्याच्या ठराविक कंपूपर्यंत मर्यादित राहतो. त्याला लोकांचा पाठींबा मिळत नाही आणि त्यांची मांडणी आणि समाजाच्या धारणा यात अंतर पडत जाते.
काही एनजीओ जशी वर्तमानपत्रांची कात्रणे जमा करून खूप काम झाल्याचा आभास निर्माण करतात आणि निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करतात तसाच प्रकार वैचारीक क्षेत्रात सुरू आहे. हे लोक ही असाच आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र परिणाम शुन्य असतो. कसूरी प्रकरणातही कुलकर्णी यांना पाकचे एजंट ठरवण्यात आले आहे. आणि घटनेनंतर कुलकर्णी यांनी जो काय सवंग प्रकार केला त्यावरून त्यांनाही माध्यमांचा वापर करून मोठा इम्पॅक्ट झाल्याचा अभास निर्माण करायचा होता असे दिसते.

समाजामध्ये सर्वबाजूनी विचार करण्याची क्षमता
असणारे लोक संख्येने खूप कमी असतात. बहुतांश लोक फास्टफूडसारखी तयार मांडणी स्वीकारून
आपली मते बनवत असतात. असे लोक जगाकडे ब्लॅक अॅण्ड व्हाईट या रंगातच पाहतात. त्यांची स्वपक्ष आणि शत्रूपक्ष
अशी सरळ विभागणी असते. त्यांच्यासमोर कोणताही
तर्क चालत नाही. खरे तर असे सरळ ब्लॅक
अॅण्ड व्हाईट असत नाही थोडा फार ग्रे एरीया पण असतो. पाकीस्तानच्या बाबतीत तो कमी असेल
पण असेल निश्चित. त्यालाही संधी द्यायला काय हरकत आहे. वाजपेयी यांनी ही संधी दिली होती.
पण त्यावेळी शांती वार्ता सुरू असताना कारगिल घडले होते. तरीही सर्व पर्याय खुले ठेवूनही शांती
प्रयास सुरू ठेवणे आवश्यक असते. पण हे समजणारा प्रगल्भ समाज निर्माण करण्यासाठी
मूळापासून आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. पण ते न करता देशातल्या अनेक विचारवंतांनी स्वीकारलेल्या राजकीय तडका असलेल्या शार्टकटमूळे परिस्थिती अधिकच चिघळू
शकते. मात्र ती चिघळावी हाच हेतू असेल, आणि तसा प्रयास करणाऱ्या विघातक शक्तींना विचारवंत आपला खांदा वापरायला देत असतील आणि त्यांना पुरक मांडणी होत असेल तर ती या राडेबाजीपेक्षा भयंकर ठरेल..
No comments:
Post a Comment