दहशतवाद्यापेक्षा अधिक घातक
कर्नल संतोष महाडिक यांना श्रद्धांजली वाहताना या देशातील प्रत्येक घटक त्यांच्याप्रमाणेच आपआपल्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावतोय का हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारला पहिजे. कारण आजूबाजूला बघितल्यानंतर तरी तसे वाटत नाही. काही दिवस आपण हळहळ व्यक्त करतो आणि येरे माझ्या मागल्या सुरु करतो. पाश्चात्य देशात जितकी मानवी जीवनाची किमत आहे तितकी आपल्याकडे का नाही. आपण बलिदानाचे सोहळे साजरे करतो. पण त्यातून अशी बलिदाने थांबणार नाहीत. जिकडे तिकडे टक्केवारी आणि कट यांचेच अस्तित्व आहे. आपल्याला स्वतःच्या स्वार्थापलीकडे काही दिसत नाहि. असे कुणी हुतात्मा झाले कि समाज माध्यमांवर देशप्रेमाचा पूर येतो. आणि नंतर विसरून जातो. आपले कट आणि टक्केवारी, चिरीमिरी यामध्ये मश्गुल होऊन जातो. महाडिकासारखे बलिदान झाले कि देशप्रेमाने भारावून जातो आपली गिल्ट कॉन्शस दूर करण्यासाठी अशा घटनांचा आपण वापर करतो हा गिल्ट कशामुळे यतो याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरन. याआधी फेसबुक वर प्रसिद्ध झाले आहे पण महाडिकांच्या बलिदानाच्या निमित्ताने पुन्हा ईथे देत आहे.
गुरुवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास पाचजण मोरवाडीत (पिंपरी) येथील श्रद्धा हेरिटेज या इमारतीत घुसले. होंडा अॅसेंट कारमधून आलेल्या या पाचजणांनी पहिल्यांदा वाॅचमनला चाकुचा धाक दाखवून शांत केले. पुढच्या दहा मिनिटात त्यांनी इमारतीतील दोन सदनिका फोडल्या. तिसरी सदनिका फोडत असताना कटावणीचा आवाज झाल्याने समोरच्या सदनिकेतले लोक जागे झाले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून एका जबाबदार नागरिकाने पोलिसांना 100 नंबरवर काॅल केला. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले होते. ते घरात गेल्यानंतर बाहेरून लाॅक करायचे, तो पर्यंत पोलिस येतील. असा रहिवाशांचा कयास होता.
गुरुवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास पाचजण मोरवाडीत (पिंपरी) येथील श्रद्धा हेरिटेज या इमारतीत घुसले. होंडा अॅसेंट कारमधून आलेल्या या पाचजणांनी पहिल्यांदा वाॅचमनला चाकुचा धाक दाखवून शांत केले. पुढच्या दहा मिनिटात त्यांनी इमारतीतील दोन सदनिका फोडल्या. तिसरी सदनिका फोडत असताना कटावणीचा आवाज झाल्याने समोरच्या सदनिकेतले लोक जागे झाले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून एका जबाबदार नागरिकाने पोलिसांना 100 नंबरवर काॅल केला. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले होते. ते घरात गेल्यानंतर बाहेरून लाॅक करायचे, तो पर्यंत पोलिस येतील. असा रहिवाशांचा कयास होता.
पण कशाचं काय काही तरी चमत्कार झाला आणि चोरटे अर्धवट फोडलेला फ्लॅट तसाच सोडून खाली उतरले आणि गाडी घेऊन पसार झाले. काही वेळातच नाईट पॅट्रोलचे मार्शल तिथे दाखल झाले. रहिवाशांनी चोरट्यांची गाडी आताच गेल्याचे सांगितले. पण मार्शलनी अथवा त्यानंतर आलेल्या पोलिसांनी पाठलाग करण्यामध्ये फारसे स्वारस्य दाखवले नाही. दोनच दिवसापूर्वी त्याच सोसायटीत दूसर्या इमारतीत पाच सदनिका फोडल्या होत्या.100 नंबर वर फोन जाणं, चोरट्यानी त्यांची मोहीम अर्धवट सोडून पळून जाणं. आणि त्यानंतर पोलिसांचं घटनास्थळी दाखल होणं यामध्ये काही परस्परसंबंध असावा काय? घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणारयांचं तरी तसं मत बनलंय. एका पूर्वानुभवावरून मलाही वाटतं की शंका घ्यायला जागा आहे. एक पत्रकार मित्र रेजिल मेनन यांनी पोलिस आणि गुन्हेगारांची अशीच लिंक एस्टाब्लीश केली होती. पुणे स्टेशन वरील तीन पत्तीच्या जुगारा विरोधात कंट्रोल ला काॅल गेला की असाच चमत्कार व्हायचा. कंट्रोलला काॅल गेल्यानंतर यातल्या मुख्य माणसाला काॅल येतो. याचे व्हिडीओ रेकाॅर्डिंगही केले होते. काळे धंदेवाल्याकडून, बेकायदा वाहतूकदारांकडून, उशीरा सुरू असणार्या हाॅटेल आणि बार मालकांकडून पोलिस हप्ते घेतात असे ऐकले होते. आपल्या देशात पोलिसाला पाहिले की लोकांना सुरक्षित वाटण्याऐवजी उलट भितीच वाटते याची हीच कारणे असावीत बहुधा.
पण थेट चोरांशी हातमिळवणी ही अतिशय अस्वस्थ करणारी बाब आहे. उद्या त्यांनी अतिरेक्यांशी हातमिळवणी केली तर किंवा सीमेवरच्या सैनिकांनी शत्रूशी हातमिळवणी केली तर, या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. आम्हा सगळ्यांनाच स्वार्थाने इतकं अंध केलेय का की ज्यामुळे कुठे थांबायचं हे आम्हाला कळतच नाही? तत्काल स्वार्थ आपल्याला इतके महत्वाचे झालेत की समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून आपण आपण सेल्फ डिस्ट्रक्शन मोडवर चाललो आहोत याचं भानच राहू नये?
हे सरकारचे अपयश आहे. जवाब दे मोदी सरकार असे कुठल्याही छोट्यामोठ्या घटनेबद्दल आपण वारंवार ऐकतो. पण असली राजकीय सवंगता आपल्या समाजजीवनात खोलवर रुजलेल्या अपप्रवृत्ती उखडून फेकू शकणार नाही. त्यासाठी गंभीर शस्त्रक्रिया कराव्या लागतील. ती कुणा पक्षाची किंवा सरकाची जबाबदारी नाही. सगळ्यांना सामुहिकपणे हा राक्षस गाडला पाहिजे. पण प्रश्न असा आहे की त्यासाठी आपली मानसिक तयारी, किमान परिस्थितीचे गांभीर्य आम्हा लोकांना आहे का?
No comments:
Post a Comment